आंबेगाव तालुक्यात ४१ हजार ६१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणा-या २५ ग्रामपंचायतीसाठी ७६.९९ टक्के मतदान झाले. यात १९ हजार ७२५ महिला तर २१ हजार ८८५ पुरूष अशा एकुण ४१ हजार ६१० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सर्व आवश्यक यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांच्या रांगा लागल्या तरीही शारीरिक अंतराचे पालन ठेवूनच मतदान करून घेतले जात होते. मतदान केंद्रात चेह-यावर मास्क पाहूनच व सॅनिटायझर लावून मतदारांना आत सोडले जात होते. मतदान शांततेत व्हावे यासाठी ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर पोलीस वाहने फिरून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करीत होती.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कलम १४४ लागू
Next articleअमली पदार्थाचा विळखा तरुणाईला धोकादायक – आमदार चेतन तुपे