घोडेगाव बसस्थानकात महिलेच्या बॅगमधील ३० हजार रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांने लांबविली

Ad 1

प्रमोद दांगट, निरगुडसर

मुंबई येथे आपल्या मुलाकडे निघालेल्या महिलेच्या बॅगमधील ३० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घोडेगाव बस स्थानकावर घडली आहे. याबाबत कांता कैलास फलके ( वय ६२ रा.आंमोडी रामवाडी ता.आंबेगाव जि.पुणे ) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी कांता फलके यांचा मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहत असून त्याला काही कामानिमित्त पैशाची गरज होती त्याने आपल्या आईला पैसे घेऊन येण्यासाठी सांगितले होते.कांता फलके या मंगळवार दि.१२/१/२०२० रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ३० हजार रुपये रोख रक्कम घेऊन घोडेगाव बस स्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी त्या मुंबई मध्ये जाणाऱ्या बस मध्ये चढल्यानंतर त्यांनी कंडक्टरला बस कोणत्या मार्गे जाणार आहे असे विचारले कंडक्टरने बस खाडीपूल मार्गे जाणार आहे असे सांगितले फिर्यादी फलके यांना खाडी पूल मार्गे जायचे नसल्याने त्या खाली उतरल्या खाली उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅगेची चैन अर्धवट उघडी असल्याचे दिसले.त्या वेळी त्यांनी बॅगमध्ये पाहिले असता त्यांना रक्कम सापडली नाही त्यांनी आजूबाजूला पाहिले असता त्याना त्यांचे पाकीट मिळाले नाही. त्या ज्या बसमध्ये चढल्या होत्या ती बस निघून गेली होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की बसमध्ये चढल्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट व घरपट्टीच्या पावत्या चोरून नेल्या आहेत. याबाबत त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहे.