मंचर बसस्थानकात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

प्रमोद दांगट , निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंचर बस स्थानकावर गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुण मंचर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत उर्फ पिल्या संदीप राजगुरू (वय वर्षे १९ रा. नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवार (दि. 14) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर खबाले, पोलीस कॉन्स्टेबल पी एच मराडे, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे ,पोलीस स्टेशन येथे हजर असताना पोलीस सब इन्स्पेक्टर खबाले यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मंचर बस स्थानकावर एक पांढरा रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅंट परिधान केलेला तरुण संशयित उभा असून तो कोणत्यातरी उद्देशाने तिथे उभा आहे .

याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कोरे यांनी याबाबत घटनास्थळी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी संबंधित पोलिस स्टाफ त्याठिकाणी गेले असता वरील वर्णनाचा तरुण बस स्थानकावर शौचालयाचे आडोशाला उभा होता. यावेळी पोलिसांनी त्याला त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव श्रीकांत उर्फ पिल्या संदीप राजगुरू वय वर्षे 19 राहणार नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळाला आहे.पोलिसांनी गावठी कट्टा ताब्यात घेऊन तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक नवनाथ नाईकडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर खबाले करत आहे.

Previous articleकचऱ्याचे ढीग तत्काळ हटवा अन्यथा आंदोलन खासदार कोल्हे व आमदार तुपे यांचा महापालिका प्रशासनाला इशारा
Next articleघोडेगाव बसस्थानकात महिलेच्या बॅगमधील ३० हजार रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांने लांबविली