Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक घटना घडली आहे.
येथे एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला साडी, छत्री व बादली चे वाटप चालू असताना बुधवार दिनांक १३ रोजी रात्री उशिरा सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ओतूर विकास आघाडी पॅनलचे प्रमुख तानाजी तांबे यांनी याबाबत रितसर तक्रार ओतूर पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे.

या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे संबंधित पॅनलच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी ओतूर विकास आघाडीचे पॅनल प्रमुख तानाजी तांबे यांनी केली आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली असल्याची माहिती तानाजी तांबे यांनी दिली.
ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सुरेश शेटे याच्यावर भा.द.वि. कलम १७१ (ई) या कलमानुसार आचारसंहितेचा भंग व मतदारांना आमिष दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.