लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे- तहसीलदार रमा जोशी यांचे आवाहन

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने संबंधित ग्रामपंचायतील मतदारांनी देखील लोकशाही व्यवस्था बळकट करणेकामी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा व सदर प्रक्रियेमध्ये प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.

तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीं पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन उर्वरीत २५ ग्रामपंचायतींसाठी ३६६ उमेदवारांची नावे चिन्हांसह मतदान यंत्रातील सिलींगप्रक्रीया यापूर्वीच झाली. तहसिल कार्यालयाच्या आवारात साहित्य वाटपासाठी भव्य मंडप उभारला आहे. मतदान साहित्य व कर्मचारी पोचविण्यासाठी १२ खाजगी बसेस व ६ जीप गाडया आरक्षित करण्यात आली आहे. या वाहनांतून गुरूवारी (दि.१४) कर्मचा-यांना मतदान केंद्रांवर पोचविण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचारी ६६० आहे. एकूण ९२ मतदान केंद्रे आहेत. तर २५ ग्रामपंचायतींच्या १७५ जागांसाठी ३६६ उमेदवार रिंगणात आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. गुरूवारी (दि.१४) तहसिल कार्यालयाच्या आवारातून मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचा-यांना मतदान साहित्य व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. गुरूवारी दुपारी चार वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोचतील असे तहसिलदार रमा जोषी यांनी सांगितले.

Previous articleदोन दुचाकीस्वारांची जोरदार धडक दोन्ही दुचाकीवरील चालक ठार
Next articleओतूर मध्ये मतदारांना साडी, छत्री, बादली यावस्तूंचे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले