दोन दुचाकीस्वारांची जोरदार धडक दोन्ही दुचाकीवरील चालक ठार

शिक्रापूर-निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत दोन दुचाकींची धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ( दि.10) रोजी घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की निमगाव म्हाळुंगी गावच्या हद्दीत असलेल्या काजू फॅक्टरी समोर हर्षद दत्तात्रय चव्हाण ( वय.वर्षे 23 रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर, जि. पुणे ) याच्या कडील बजाज सिटी एम एच 12 सी ए  2477  व अंकुश बापू चोरामले (रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर )यांचे ताब्यातील स्प्लेंडर एम एच 12 के डब्ल्यू 0814  या वाहनाची भरधाव वेगात असताना जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला या अपघातात हर्षद चव्हाण याच्यावर शिक्रापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अंकुश चोरमले यांचाही शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद सुखदेव लक्ष्मण चव्हाण यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट करत आहेत.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाळुंगे पोलीसांचा रूट मार्च
Next articleलोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे- तहसीलदार रमा जोशी यांचे आवाहन