ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाळुंगे पोलीसांचा रूट मार्च

चाकण-खेड तालुक्यात आगामी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूका या शांततेत पार पडाव्यात या अनुषंगाने श्री क्षेत्र महाळुंगे पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलिस चौकीच्या वतीने महाळुंगे पोलीस चौकीचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची रूट मार्च काढण्यात आला.होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि निवडणूक शांततेत पार पाडाव्यात याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सूचना दिल्या.

तसेच म्हाळुंगे येथील सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी होमगार्ड असे सोबत घेऊन महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील महाळुंगे गावात रूट मार्च काढण्यात आला.तसेच आगामी येणार्‍या निवडणूक संदर्भात गावाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाळुंगे पोलिस चौकीचे निरीक्षक अरविंद पवार चौकीचे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

Previous articleलग्नमंडपात शेवटची मंगलाष्टका सुरू असतानाच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Next articleदोन दुचाकीस्वारांची जोरदार धडक दोन्ही दुचाकीवरील चालक ठार