अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

शिक्रापूर- पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चाकण चौक येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा एम एच 12 पी क्यू 0002 या वाहनावर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केली असून वाहन व वाहनातील 5 ब्रास वाळू जप्त केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण चौक येथे पोलीस सब इन्स्पेक्टर माळी ,होमगार्ड कदम हे दि .9 रोजी नाकाबंदी करीत असताना एक हायवा ट्रक एम एच 12 पी क्यू 0002 हा शिरूर कडून चाकण कडे जात होता. त्यावेळी त्याला थांबन्यास सांगितले असता तो थांबला नाही त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्यावेळी त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव गुलाब भाई शेख ( राहणार गोलेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे ) असे सांगितले त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये पाच ब्रास वाळू मिळून आली याबाबत चौकशी केली असता त्याचेकडे कुठलीही प्रकारची रॉयल्टी व कोणताही परवाना नसल्याचे समोर आले याबाबत पोलिसांनी हायवा ट्रक व वाळू मिळून एकूण 25 लाख 40 हजार रुपयाची जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल बापू हाडगळे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर माळी करत आहेत.

Previous articleश्री.क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील पिंगळेमळा रस्ता वाहतुकीसाठी खुला
Next articleलग्नमंडपात शेवटची मंगलाष्टका सुरू असतानाच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू