श्री.क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील पिंगळेमळा रस्ता वाहतुकीसाठी खुला

प्रमोद दांगट , निरगुडसर

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील सटवाजी बाबा पिंगळेमळा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने येथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग तालुका आंबेगाव येथील गावाला मिळणारा सटवाजी बाबा येथील पिंगळेमळा वस्तीवरील रस्ताची गेल्या अनेक वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था होती पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करताना वृद्ध महिला, शाळकरी मुले, शेतकरी ,यांना मोठी कसरत करावी लागत होती त्यामुळे या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.काही दिवसापूर्वी या रस्त्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्यानंतर या रस्त्याचे नुकतेच खडी मुरमी करणाचे काम झाले असून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा रस्ता झाल्याने पिंगळेमळा येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या रस्त्यासाठी ज्ञानेश्वर खीरड पत्रकार, चंद्रकांत हरिभाऊ पिंगळे,लव्हजीशेठ नारायण पिंगळे,संदीप उर्फ संजु भैय्ये उमेदवार, निलेश मोढवे सतीश हरिभाऊ पिंगळे, तानाजी पिंगळे राॅकी भैय्ये यांनी पाठपुरावा केला आहे.

Previous articleऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला मोटारसायकलची धडक : दुचाकीस्वार ठार
Next articleअवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई