ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला मोटारसायकलची धडक : दुचाकीस्वार ठार

प्रमोद दांगट निरगुडसर

जारकरवाडी ( ता.आंबेगाव ) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील चालकाचा मृत्यू व पाठीमागे बसलेल्या व्यक्ती जखमी झाला असल्याची घटना मंगळवारी दि. १२/१/२०२१ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मंचर पोलसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जारकरवाडी गावचे हद्दीत,बढेकरमळा रोडने जात असताना धामणी बाजुकडुन पारगाव बाजुकडे जाणारा ट्रॅक्टर क्रं एम.एच.१४ बी.एच.१४७४ हयावरील चालक ट्रॅक्टरला दोन उसाने भरलेल्या ट्रॉली जोडुन घेवुन जात होता .त्यावेळी ट्रॅक्टरला मागे जोडलेल्या ट्रॉलीची बजाज डिसकव्हर मोटार सायकल ( एम.एच.१४ डी.डी.१००४ ) धडक लागून अपघात झाला या अपघातामध्ये हनुमंत रघुनाथ बो-हाडे ( वय ५५ वर्षे रा बो-हाडेमळा धामणी ता.आंबेगाव जि.पुणे) हा गंभीर जखमी झाले होते तर पाठीमागे बसलेले सुभाष हनुमंत जाधव हे जखमी झाले होते यातील हनुमंत बोऱ्हाडे यांना पारगाव येथील आधार हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले व तेथुन पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालय मंचर येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासणीपुर्वीच ते मयत झाले असल्याचे सांगितले या संदर्भात फिर्याद सुभाष हनुमंत जाधव (वय ४७ वर्ष धंदा.शेती रा.धामणी द्रोणागिरीमळा ता.आंबेगाव जि.पुणे) यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कांबळे करत आहे.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून लोणी काळभोर येथे दोन गटात तुफान हाणामारी
Next articleश्री.क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील पिंगळेमळा रस्ता वाहतुकीसाठी खुला