ग्रामपंचायत निवडणुकां मध्ये गोंधळ व गैरप्रकार केल्यास कोणाचीही गय नाही – स.पो. निरीक्षक दत्तात्रय गुंड

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये मतदान व मतमोजणी होईपर्यंत येथे कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये. तसेच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी केले.याच पार्श्वभूमीवर वारूळवाडी परिसरात आज दुपारी नारायणगाव पोलीसांनी रूटमार्च काढला.


याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी आवाहन केले आहे की, सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शांततेत मतदान करावे.