कळंब येथे बायको पळवून आणलेच्या संशयावरून एकावर सुरीने वार ;मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कळंब ता.आंबेगाव येथे बायको पळवून आणली या संशयावरून अहमदनगर येथील नात्यातील एकाने विजय राजगुरू यांच्यावर सुरीने वार केल्याची घटना घडली आहे. याबाबत विजय बबन राजगुरू (वय ३५ रा.कळंब इंदिरानगर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे )यांनी आपल्याच नात्यातील सुनील दामोदर जगधने ( रा. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत विजय राजगुरू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दि २ रोजी पहाटे विजय राजगुरू यांच्या घरावर पत्र्याचा आवाज येत असल्याचे ऐकू आले त्यावेळी राजगुरू यांनी घराबाहेर येऊन शिडी लावून पत्र्यावर पाहिले असता घरावर त्यांच्या नात्यातील सुनील जगधने घरावर लपून बसला होता त्यावेळी फिर्यादीने त्याला ओळखले असता तू इथे काय करतो असे विचारले त्यावेळी जगधने यांनी तू माझी बायको पळवून आणली आहे तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत शिवीगाळ केली तसेच राजगुरू यांच्या अंगावर धावत जाऊन हातातील सुरीने त्यांच्या माडीवर सूरी मारली त्यांच्या भांडणाचा आवाज झाल्याने राजगुरू यांची पत्नी बाहेर आली व तिने आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना जमा करून भांडण सोडवले. याबाबत विजय राजगुरू यांनी सुनील दामोदर जगधने (रा.दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून जगधने यांच्यावर कलम ३२४,३२३,५०४,५०६ नुसार,गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंचर पोलीस पुढील तपास करत आहेत

Previous articleमंचर येथून महिंद्रा कंपनीच्या पिकअपची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Next article‘पुण्या’साठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमा – उपमुख्यमंत्री अजित पवार