वेगरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील सरपंच मिंनाथ कानगुडे

पौंड- वेगरे( ता .मुळशी ) येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा सरपंच मिंनाथ कानगुडे यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.यापुढील काळात वेगरे गावातील सर्व घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी व सर्व वाड्या-वस्त्यांवर प्रत्येकाच्या दारापर्यंत रस्ता पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सरपंच मिंनाथ कानगुडे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गुंड, उद्योजक नवनाथ कानगुडे, उपसरपंच सुमनांजली आखाडे, उद्योजक राहुलशेठ गोविलकर , तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण कानगुडे,माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे ,ग्रामपंचायत सदस्य राम बावधने, धोंडिबा ढेबे,तानाजी कोकरे ,ज्येष्ठ नागरिक जणू कोकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बमाबाई बावधने, शशिकला मरगळे, पै दिलीप कोळेकर, चिंतामण कानगुडे, दत्तात्रय कानगुडे, अमोल गुंड ,लहू गांडले ,रवींद्र गुंड,कोंडीबा सामा बावधने, सुनील बावधने,बाबू मरगळे,न्यानेश्वेर बावधने, कोंडीबा मरगळे ,सदाशिव ढेबे, महादेव कोकरे, ग्रामपंचायत कर्मचारी रामभाऊ कोकरे ,रामभाऊ बावधने ,मारुती आखाडे, अनंता कोकरे, संतोष आखाडे व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वेगरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निरगुडवाडी ते ढेबे वस्ती पर्यंत झालेल्या रस्त्याचे उद्घाटन कोंडीबा मरगळे( भगत) यांच्या हस्ते व सर्वांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.

दारूबाई देवीच्या परिसरामध्ये देवीच्या छोट्या पत्रा शेड चे भूमिपूजन सरपंच श्री.मिंनाथ कानगुडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

वेगरे गावातील स्वयंभू व जागृत देवस्थान असलेल्या कोंडजाई देवस्थान कडे लोकवर्गणीतून जाणाऱ्या रस्त्याचे राजेंद्र गुंड यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

मंडवखडक येथील आखाडे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण कानगुडे यांच्या हस्ते व रामभाऊ धोंडीबा बावधने यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन उद्योजक राहुल शेठ गोविलकर यांच्या हस्ते संपन्न झाले .

यावेळी सरपंच मिंनाथ कानगुडे मित्र परिवाराच्या वतीने वेगरे गावातील कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले व राजाभाऊ गुंड मित्र परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांना तिळगुळ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांनी केले तर आभार अनंता कोकरे यांनी मानले.

Previous articleनारायणगाव मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
Next articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न