नारायणगाव मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट , धर्मवीर संभाजी पतसंस्था आणि समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अशी माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डेरे आणि समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकभाऊ वारुळे यांनी दिली.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मंचर येथील आदर्श शिक्षक डॉ. ज्ञानेश्वर थोरात उपस्थित होते.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज माजी अध्यक्ष किरण मांजरे,जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन पडवळ, उपसरपंच सारीका डेरे, माजी उपसरपंच संतोष दांगट, धर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख,श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, रामशेठ दळवी, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले डॉ.अरुणा वाघोले, राखी रत्नपारखी,आशिष माळवदकर, सुरज वाजगे हर्षल मुथा,गणेश वाजगे, तेजस रोकडे,राजेश रत्नपारखी इत्यादी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते भैरवनाथ देवाची आरती, स्मारक व प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व्याख्यान आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.

तसेच याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या राज्य पुरस्कार नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षल मुथा यांना राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर प्राध्यापिका डॉ.अरुणा वाघोले यांना पुणे विद्यापीठाची पी.एच. डी. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल आणि तेजस रोकडे यांच्या विशेष
सहकार्याबद्दल यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकभाऊ वारुळे यांनी केले व सूत्रसंचालन माजी उपसरपंच आशिषभाऊ माळवदकर व मेहबूब काझी सर यांनी केले.