घोडेगाव पोलीस ठाण्यात राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सिताराम काळे घोडेगाव- राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त घोडेगाव पोलीस ठाणे येथे सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

घोडेगाव पोलीस ठाणेमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक लहु शिंगाडे, सहायक फौजदार नवनाथ वायाळ, पोलीस हवालदार शंकर तळपे, महेश झनकर, अनिल बकरे, दिपक काशिद, संदिप लांडे, दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, अमोल काळे, शांताराम तांगडे, मंगल शिंदे, सोनाली रघतवान, वृशाली भोर, स्वप्निल कानडे आदि उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत घोडेगाव येथे राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या प्रतिमेस पूश्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. गायत्री काळे, ज्योति घोडेकर, ग्रामपंचायत सदस्या शोभा सोमवंशी, अर्चना घोडेकर, सदस्य सुनिल इंदोरे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व ग्रामंपचायत कर्मचारी कैलास डोके, नंदा बो-हाडे, सुप्रिया हुले, युवराज गुंजाळ, श्वेता अवसरे, किशोर डोंगरे आदी उपस्थित होते.

Previous articleडिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात आजोबा व आठ वर्षीय नातीचा बुडून मृत्यु
Next articleजिजाऊंच्या कर्तृत्वाची गावा गावात पारायणे व्हावी – दशरथ यादव