डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात आजोबा व आठ वर्षीय नातीचा बुडून मृत्यु

सिताराम काळे घोडेगाव
आंबेगाव तालुक्यातील चास गावाजवळील शेगरमळा येथे डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात आठ वर्षीय अन्विता शेगर व आजोबा सदाशिव शेगर यांचा बुडुन मृत्यु झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील शेगरमळा येथे अन्विता प्रल्हाद शिंदे (वय-८) ही मंगळवारी (दि. १२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात पडली असल्याचे कळंताच तीला पाण्यातुन काढण्यासाठी कॅनॉलच्या जवळ शेतात काम करणारे अन्विताचे आजोबा सदाशिव विष्णु शेगर (वय-६०) यांनी कॅनॉलच्या पाण्यात उडी मारली. परंतु तेही पाण्यात बुडाले या दोघांना पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी गावातील व आजुबाजुचे शेतात काम करणारे नागरिकांनी कॅनॉल मधील पाण्यातुन बाहेर काढुन ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे आणले असता दोघांना डॉक्टरांनी तपासुन मयत झाले असल्याचे सांगितले.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास कायदेशिर कारवाई करण्याचा सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचा इशारा
Next articleघोडेगाव पोलीस ठाण्यात राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी