ग्रामपंचायत निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास कायदेशिर कारवाई करण्याचा सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचा इशारा

सिताराम काळे घोडेगाव

 घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणा-या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुक असलेल्या गावांमध्ये नागरिकांच्या बैठका घेवून गावक-यांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोठेही अनुचित प्रकार घडला तर संबंधित व्यक्तिंवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला.

घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सर्व गावांना भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. तसेच गट-तटाच्या राजकारणावरून ताणतणाव निर्माण होवू नये, म्हणून प्रत्येक गावात स्थानिक उमेदवार व गावकरांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.

निवडणुक प्रक्रिया हसत-खेळत पार पाडावी निवडणुक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमावली नुसार प्रक्रिया पार पाडून सर्व उमेदवार व नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअॅप व इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकु नये. तसेच निवडणुक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यादृष्टीने गावागावात सलोखा राखणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात क्षुल्लक कारणांवरूनही वाद होवून त्याचे पर्यावसन हाणामारीत होते. ही स्थिती उद्भवू नये म्हणून ज्या गावांमध्ये निवडणुका होत आहेत, त्या निवडणुका निकोप आणि शांततेच्या वातावरणात व्हाव्यात यासाठी यावर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे. यामध्ये कोणी अनुचित प्रकार करताना आढळून आल्यास त्याचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

Previous articleअश्या होत्या राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ…
Next articleडिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात आजोबा व आठ वर्षीय नातीचा बुडून मृत्यु