स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या सेटवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी

अमोल भोसले,पुणे –

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या सेटवर आज सुप्रसिद्ध अभिनेते व वृक्षसंवर्धन मित्र सयाजी शिंदे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन अभिनव पद्धतीने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

गेल्या वर्षभरापासून सोनी मराठी चॅनलवर स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सुरू आहे. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ माँसाहेबांनी केलेली जडणघडण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य याची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी ही मालिका सुरू आहे. आज राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती असल्याने या मालिकेत जिजाऊ माँसाहेबांची भूमिका करणाऱ्या नीना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सयाजी शिंदे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वृक्षारोपण करुन या निमित्ताने एक वेगळा असा पर्यावरण रक्षणाचा संदेश आपल्या कृतीतून दिला.

याप्रसंगी मालिकेचे दिग्दर्शक हेमंत देवधर तसेच अन्य सहकलाकार व प्रॉडक्शन टीम आदी उपस्थित होते.

Previous articleसर्वोच्च न्यायालयाचा नविन कृषी कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा -जयंत पाटील
Next articleअश्या होत्या राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ…