हुक्का पार्लर आणि पब चालकांचा पोलीसांना चकवा कि ‘पबला’ पोलीसांचा वरदहस्त?

लोणी काळभोर (सुचिता भोसले) :

हुक्का पार्लरवर बंदी असताना लोणी काळभोर येथील क्लब जे2के नावाच्या हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्का घेतला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात लहान मुला-मुलींच्या जीवाशी खेळ होत असल्याचे देखील समोर आले आहे.

दरम्यान याबाबत नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पोलीसांचे पथक पोलीस ठाण्यातून कारवाईला निघत असतानाच त्याची माहिती ही पब चालकाला मिळते आाणि तात्पुरत्या स्वरूपात तो पब बंद केला जातो. आणि पोलीस गेले की परिस्थिती ‘जैसे थे’होते.

पबला’ पोलीसांचा वरदहस्त ?

कारवाईसाठी पोलीस हे ठाण्यातून निघाले ही गोष्ट पब चालकाला कळतेच कशी? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. चिरीमीरी घेऊन पोलीस याकडे दुर्लक्ष का हेही विरिष्ठांनी तपासणे गरजेचे आहे. पबमध्ये प्रवेश करताना ठराविक वय पाहून आतमध्ये प्रवेश दिला जातो. पण या पबमध्ये त्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या पबमध्ये काही फॅमिली सुध्दा येत असल्याचे समोर आले आहे. पोलीस येताच पब बंद होतो आणि पोलीस गेले की पब चालू कसा होतो हे तपासणे गरजेचे आहे. जर त्यात पोलीसांचा सहभाग असेल तर त्यांच्या निलंबनाची कारवाई ही नक्कीच व्हायला हवी.

Previous articleचासमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जंयतीनिमीत्त रक्तदान शिबिर संपन्न
Next articleसंग्राम घोडेकर यांच्या मुख्य मारेकऱ्यांना अवघ्या तीन दिवसात अटक