मंचर येथून महिंद्रा कंपनीच्या पिकअपची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाफगावकर गॅरेज च्या समोर लावलेली महिंद्रा मॅक्स कंपनीचे पिकप चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक २७ रोजी घडली असून या बाबत पीकअप मालक नितीन खंडू निघोट ( वय ३६ रा.निघोटवाडी ता.आंबेगाव ,पुणे)यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मंचर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप मालक नितीन खंडू निघोट हे दिनांक २७ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आपली पिकप गाडी घेऊन कामावर गेले होते दिवसभर काम करून रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी गेटवेल हॉस्पिटल शेजारी वाफगावकर गॅरेज मध्ये नेहमीप्रमाणे पिकप गाडी पार्क करून ते घरी गेले दुसऱ्या दिवशी ते कामावर गेले असता त्यांना गाडी जाग्यावर आढळून आली नाही त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना पिकअप कोठे मिळून आली नसल्याने त्यांची गाडी चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीकअप गाडीचे वर्णन :

गाडीचा नंबर एम.एच.१४ ए.झेड.५२३२ ,इंजिन क्रमांक GG91D50604 ,चाशी क्रमांक – MA1ZG2GGA91D30534 , सपेत रंग समोरील का चोर विघ्नहर्ता असे रेडियम मध्ये नाव असून डाव्या कोपऱ्यात मोबाईल नंबर आहे तरी सदर वर्णनाची गाडी कुठे दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस हा डिजिटल माध्यमातून संवाद साधणारा राज्यातील सर्वात मोठा पक्ष-जयंत पाटील
Next articleकळंब येथे बायको पळवून आणलेच्या संशयावरून एकावर सुरीने वार ;मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल