धोकादायक गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा उपलब्ध कराव्यात -आमदार दिलीप मोहिते पाटील

Ad 1

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील माळीण सद्ष्य धोकादायक गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी असे म्हंटले आहे की पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, भोर, वेल्हे, मावळ या तालुक्यातील गावांना पावसाळ्यात दरड कोसळून आपत्ती होण्याचा धोका आहे. तसेच खेड तालुक्यातील भोरगिरी, पदरवस्ती, भोमाळे ही गावे अत्यत डोंगर उतारावर वसलेली असल्याने या गावांना दरड कोसळून माळीण सद्ष्य धोका होऊ शकतो.

तसेच सध्या पावसाळा सुरू झाला असून या धोकादायक गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे करावयाची असतात. अशी कामे या गावात अध्यापही झालेली नाहीत. तसेच कामे न झाल्यामुळे या गावात मोठा धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे
आहे.