भिमसेना महासंघ पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुचिता हरपळे यांची निवड

पुणे प्रतिनिधी : भिमसेना महासंघ या सामाजिक संघटना महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता हरपळे यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्यातील, सुशिक्षित बेरोजगार, बेराजगार अभियंता, शासकीय कंत्राटदार, शासकीय / निमशासकीय कर्मचारी, कामगार, माथाडी, रिक्षा / टॅक्सी चालक मालक, हॉकर्स, मजुर, शेतमजुर इत्यादी क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींसाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भिमसेना महासंघ ही सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे.

आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून शेकडो उपेक्षित, शोषितांना, कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. भिमसेना महासंघाची ध्येय धोरणे नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेमध्ये चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन पुणे शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब, छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, छ. शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन चळवळीत काम करणार्‍यांना सामाजिक कार्यकर्त्या कुशल संघटन कौशल्य असणार्‍या हुशार, शांत, संयमी आणि नेतृत्वशील सर्व गुण संपन्न असणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या सुचीता हरपळे यांची पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक साठे यांनी नुकतीच निवड केली.

निवडी नंतर त्यांना रितसर नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुचिता हरपळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेच्या माध्यमातून वंचित उपेक्षितांना न्याय देणार : सुचिता हरपळे

भिमसेना महासंघ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा करून समाजातील गोरगरीब वंचित उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन. शिवाय संघटनेचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करुन शिस्तीने व जबाबदारीने संघटना वाढवणार यावेळी संघटनेतील सर्व पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सुचिता हरपळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Previous articleखेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लाँकडाऊन करण्याची आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली मागणी
Next articleधोकादायक गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा उपलब्ध कराव्यात -आमदार दिलीप मोहिते पाटील