खेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लाँकडाऊन करण्याची आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली मागणी

पुणे-पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मागील तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळून आले असून १३६ रुग्णसंख्या वर पोहचली आहे. त्यामुळे खेड तालुक्यात पुन्हा एकदा आठ दिवसाकरता कडक लॉकडाऊन  करावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकाऱी नवल किशोर राम यांच्याकडे कडे केली आहे.

खेड तालुक्यात १५ मे रोजी राक्षेवाडी येथे  कोरोना पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. तो रुग्ण पुणे येथे ये -जा करत होता.त्यानंतर पंचवीस जून पर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सत्तावन्न होती. मात्र गेल्या आठ दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे व असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर,आळंदी, चाकण या नगर परिषदेचा समावेश होतो. तसेच चाकण व महाळुंगे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड येथुन येणारी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राजगुरूनगर,कडूस,सा़ंडभोरवाडी,काळूस,सोळू,,आळंदी,चाकण,महाळुंगे,खराबवाडी,मेदनकरवाडी,कडाचीवाडी,नाणेकरवाडी या परिसरात मोठ्या संख्येने कामगार व स्थानिक नागरिक राहत आहे. खेड तालुक्यात प्रथमत: आढळून आलेले रुग्ण हे पुणे व पिंपरी शहरातून आल्याचे लक्षात आले आहे.

गेल्या आठ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुणांची संख्या १३६ पर्यत वाढली आहे. येथील स्थानिक नागरिकांना पुणे येथून रेड झोन मधून येणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येत असल्याने कोरोना बाधित होत असल्याचे निर्देशनास येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खेड तालुका आठ दिवसाकरता लॉक डाऊन करावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

खेड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या व हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा वगळता खेड तालुका आठ दिवस लॉकडाऊन करावा करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

Previous articleसाताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला;
Next articleभिमसेना महासंघ पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुचिता हरपळे यांची निवड