आम्हाला रस्ते, पाणी नको बैलगाडा शर्यत पाहिजे – बैलगाडा मालकांची मागणी

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर, आंबेगाव, खेड तसेच हवेली तालुक्यातील बैलगाडा मालकांनी आज (दि.२६) रोजी खासदार डॉ अमोल कोल्हे यांची भेट घेतली.

बैलगाडा शर्यत तात्काळ सुरू करावी यासाठी बैलगाडा मालकांचे सुमारे चाळीस जणांचे शिष्टमंडळ आज खासदार डॉ अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात आले होते.

यावेळी खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती साठी आपण संसदेत वेळोवेळी मुद्दे उपस्थित करत आहोत असे सांगितले. तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे जलीकट्टू या स्पर्धेला परवानगी आहे त्याच पद्धतीने चारशे वर्षाची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळावी अशी मागणी आपण संसदेत वारंवार करत आहोत. गोवंश रक्षण करण्याचा बनाव करणाऱ्या भाजप सरकारला आपण गोवंशाचे किती नुकसान हत आहे, हे सविस्तर दाखवून देणार आहोत.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, बैलगाडा मालक बाळासाहेब आरुडे, बाळासाहेब चव्हाण,  राकेश खैरे,  प्रकाश कबाडी,  रमेश डोंगरे,  समीर वाजगे, राजुशेठ चव्हाण, विजू गायकवाड, के के थोरात, सुरेश मातेले, विकास नायकवडी,  अप्पा जाधवर, जानकू डावखर, सोमनाथ डुंबरे, मयूर वाबळे,  अजित नेहरकर,  गिरीश आवटी, शांताराम अभंग, अजिंक्य सोमवंशी आदी बैलगाडा मालक व गाडाशौकीन उपस्थित होते.

यावेळी एका बैलगाडा मालकाच्या मुलाच्या वाढदिवसाचा केक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थिती मध्ये कापण्यात आला.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर काही बैलगाडा मालकांनी, “बैलगाडावाल्यांना तुम्ही पहिला जीव लावा. आम्ही सांगतो की, तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या जीवावर पुन्हा खासदार व्हाल, आम्हाला रस्ते नको, सन्मान नको मात्र बैलगाडा शर्यत पाहिजे. अशी मागणी काही बैलगाडा मालकांनी केली. यावर खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीविषयी न्यायालयीन प्रक्रिया, पेटा संघटना, याबाबत माहिती देऊन बैलगाडा शर्यती लवकरात लवकर कशा सुरू होती याबाबत माहिती दिली.

Previous articleनिवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ – सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी पवार यांना धमकी
Next articleभांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्याची भीती – खासदार डॉ. अमोल कोल्हे