निवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ – सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी पवार यांना धमकी

राजगुरुनगर- खेड तालुक्यातील पूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व द्वारका सेवासदन वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा कल्याणी पवार यांना निवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ अशी धमकी अज्ञात व्यक्तींनी गुरुवार दि. २४ डिसेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास दिली.

सदर मिळालेल्या माहितीवरून सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी पवार ह्या आपल्या आश्रमातील सदस्यांबरोबर जेवणाची तयारी करत असताना रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेत अचानक लाल रंगाची चार चाकी आश्रमाबाहेर आली आवाज केला आश्रमातील अनुराग व कल्याणी पवार यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत आवाज करून निवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ अशी धमकी देऊन ताबडतोब पसार झाले दमदाटी करण्यासाठी आलेल्या वाहनातील व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधला होता व परिसरातील वीज खंडित असल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसला नाही. घडलेल्या घटनेमुळे आश्रमात भीतीचे वातावरण पसरले असून कल्याणी पवार यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे अर्ज पोलीस ठाणे खेड, तहसिलदार खेड व प्रांत अधिकारी यांना दिला आहे तसेच घडलेली घटना गंभीर असून याबाबत त्यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या गोष्टीची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांनी उभे राहावे की नाही.याबाबत संबंधित घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Previous articleगौरव ‘अटल’, ‘भारतरत्न’ कर्मयोगीचा !
Next articleआम्हाला रस्ते, पाणी नको बैलगाडा शर्यत पाहिजे – बैलगाडा मालकांची मागणी