गुप्तधन मिळवून देतो असे सांगून भोंदूबाबाने केली दिड लाखाची फसवणूक ; घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ad 1

प्रमोद दांगट प्रतिनिधी

गुप्तधन काढून देतो असे सांगून वारंवार पैसे घेऊन सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदू बाबा विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू ओमदत्त शर्मा सध्या राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव मूळ राहणार विश्वकर्मा मंदिर लुधियाना पंजाब )असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाचे नाव असून या भोंदू बाबावर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत तुषार गणपत घोलप वय वर्षे 28 यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी व फिर्यादी यांची ओळख 2017 मध्ये झाली होती त्यावेळी या भोंदूबाबाने तुला गुप्तधन मिळवून देतो असे म्हणत कळंब, घोडेगाव ,भोरगिरी या गावच्या हद्दीत फिर्यादीत विश्वासात घेऊन त्याच्याकडून वेळोवेळी सुमारे 1 लाख 50 हजार रुपये घेतले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तुषार घोलप यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे.या भोंदूबाबाने जुन्नर आंबेगाव तालुक्यातील बऱ्याच लोकांना गुप्तधन काढून देतो असे सांगून फसवणूक केल्याची फिर्यादीने सांगितले आहे. घोडेगाव पोलिसांनी या भोंदू बाबा वर कलम 420 406 अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करीत आहेत.