शरद पवार वाढदिवसानिमित्त द्वारका वृध्दाश्रमात खाऊ व साहित्य वाटप

राजगुरुनगर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर पूर-कनेरसर येथील द्वारका वृध्दाश्रमास भेट देऊन खाऊ व साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष कांचनताई ढमाले, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर, शहर अध्यक्ष सुभाष होले, युवती अध्यक्षा वरुडे गावच्या उपसरपंच सौ.आशाताई तांबे,महिला अध्यक्षा संध्याताई जाधव, शहर अध्यक्ष मनीषा सांडभोर, सरचिटणीस मनीषा टाकळकर,पश्चिम अध्यक्ष सुजाताताई पचपिंड,बेबीताई कड,मंगलताई जाधव,तसेच तुकाराम गोपाळा गावडे, कुलस्वामिनी दुध संकलन केंद्राचे मालक विट्ठलशेठ गावडे, ग्रा.सदस्य अशोक शेठ गावडे, मुख्याध्यापक केरुजी गावडे, गुलाब वाघा गावडे सह पुर-कनेरसर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.द्वारका वृद्धाश्रमाच्या संस्थापिका अध्यक्ष कल्याणीताई पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleभोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन
Next articleबेल्ह्यात ८ गुंठ्यातील कांदारोप लंपास:बटाटा, कांदा चोरीनंतर शेतकऱ्यांपुढे नवे संकट