राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने बाळासाहेब शिंदे गुरुजी यांचा सन्मान

Ad 1

१० डिसेंबर रोजी केंद्रीय मानवाधिकार संघटना नवीदिल्ली यांच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त नागपूर येथे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येते या प्रसंगी देशातील विविध मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते यावेळी श्री बाळासाहेब शिंदे गुरुजी यांना राष्ट्रीय समाजगौरव पुरस्काराने राष्ट्रीय अध्यक्ष डाँ मिलिंद दहिवले व हरिओम सचित लहरी महाराज यांचे शुभहस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाा

. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस एस कुमरेसाहेब डाँ रामकृष्ण छंगाणी डाँ कुमेश्वर भगत केन्दिय मानवाधिकार सगंठन नई दिल्ली राष्ट्रीय संघटक /सहसचिव श्री दत्ताभाऊ कंद अँड प्रितम शिंदे संदेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब शिंदे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला जि प शाळा गणेशखिंड येथे ते १२ वर्षांपासून कार्यरत आहेत शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी गोरगरिब ठाकरवस्तीतील असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूलभूत गरजा पूर्ण होणेकामी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले बाॕश इंडिया फाउंडेशन व इतर सामाजिक संस्थांची मदत घेऊन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरआपल्या शाळेचा भौतिक विकास केला तसेच जनकल्याण प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामांसाठी ते नेहमीच कार्यरत असतात