शरद पवार यांना पद्मविभूषण मिळालेल्या तैलचित्राचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

अमोल भोसले,उरुळी कांचन

१२डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस त्यानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने नऊ फूट बाय सात फूट आकाराचे शरद पवार यांना ३० मार्च २०१७ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते पद्मविभूषण भेटलं त्यावेळेस चित्र हे प्रदान करण्यात आलं आणि त्यातही चित्राचा अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर तैलचित्र आहे चेतन भोसले नावाच्या युवा चित्रकाराने बनवलेले असून त्याला पंचेचाळीस दिवस लागले. याप्रसंगी आदिती नलावडे, मनोज व्यवहारे, लक्ष्मीकांत खाबिया, विक्रम लोटे उपस्थित होते.

Previous articleशिक्षकांनी शिक्षक कायदे संदर्भातील पुस्तक एस.एस.कोड यांचे वाचन करणे आवश्यक — मा.आमदार दत्ता सावंत
Next articleराष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने बाळासाहेब शिंदे गुरुजी यांचा सन्मान