शिक्षकांनी शिक्षक कायदे संदर्भातील पुस्तक एस.एस.कोड यांचे वाचन करणे आवश्यक — मा.आमदार दत्ता सावंत

Ad 1

पुणे-आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी तसेच माहितीसाठी शिक्षक कायदे पुस्तक एस.एस.कोड वाचन करणे आवश्यक आहे.पराभवाला सामोरे जाण्याची ताकद असावी. भविष्य काळात मोठ्या उमेदीने शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन कार्य करणार शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी जाऊन सोडवून घेणार. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिक्षक मेळावे घेणार. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून शिक्षक मेळावे घेवून पुढील रणनीती ठरविली जाईल असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षकचे माजी आमदार दत्ता सावंत यांनी केले.

यावेळी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शिक्षक आमदार असताना शिक्षकांच्या समस्या संदर्भात केलेल्या कार्य हे खरंच आदर्श आहे. अनेक शिक्षक बांधवांनी मनमुराद आपल्या मनातील भावना मांडल्या. मनोगतामध्ये जीवन शिंदे सर यांनी अनेक त्रुटी उणीवा व मुद्दे मांडले.

प्रस्तावना जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सचिव सुरेश कांचन सर यांनी केले तर माजी पर्यवेक्षक महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन बाळकृष्ण काकडे सर यांनी आभार मानले.