शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शिक्षकांनी केले रक्तदान

राजगुरूनगर – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे व मंत्रीमंडळाच्या आवाहनास पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ,खासदार मा. शरद पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा खेड शाखेच्या वतीने राजगुरूनगर येथील सावित्रीबाई फुले सभागृहात भव्य रक्तदान शिबीर पार पडले, यावेळी ८४ रक्तदात्यानी रक्तदान केले.महिला शिक्षिका तसेच पुरुष शिक्षक यांसह महाविद्यालयातील युवक युवती यानी रक्तदान केले.

पिंपरी चिंचवड येथील पिंपरी सर्जिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर‌ रक्तपेढीच्या डॉक्टरांनी शिबीर यशस्वी होणे कामी रक्त संकलन केले.

यावेळी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील,जि. प. अध्यक्ष निर्मलाताई पानसरे ,पंचायत समिती सभापती भगवानशेठ पोखरकर, उपसभापती ज्योतीताईअरगडे, मा. सभापती अंकुश राक्षे,स्व . आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका अध्यक्ष नितीन गोरे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब ,शतकवीर रक्तदाते ऍड,सुनील वाळुंज,पदवीधर संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख संजय वाघ,जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहेरे,मावळ तालुका अध्यक्ष जितेंद्र सावन्त,खेड तालुका अध्यक्ष नारायण करपे,महिला आघाडी अध्यक्ष संजीवन चिखले, काळुस उपसरपंच केशव अरगडे,हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन सचिव कैलास दुधाळे, मा. वि. अ . शांताराम मते,मा. सरचिटणीस सुदाम वेहळे, पत्रकार तुकाराम बोंबले,किशोर भगत, रामचंद्र सोनवणे यांसह मोठया संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.


आदरणीय शरद पवार साहेबांना आपल्या भाषणातून आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी शुभेच्छा देऊन सध्या रक्तदान शिबिराची गरज असल्याने शिक्षक संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांनी ही आपले विचार मांडले.पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती ताई अरगडे,मा. सभापती अंकुश राक्षे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहेरे,तालुका अध्यक्ष नारायण करपे,महीला आघाडी अध्यक्षा संजीवनी चिखले,राज्य प्रतिनिधी नामदेव गायकवाड,मा. अध्यक्ष मुगुटराव मोरे,आंतरराष्ट्रीय शाळा धानोरे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे,शाळा सरचिटणीस कल्याणी रामाने,सोसायटी स्थानिक लेखा परीक्षक तृष्णा घुमटकर, कार्याध्यक्षा प्रणोती गावडे,प्रसिद्धी प्रमुख सुरेखा ठोके,कोषाध्यक्षा शैला काळे, स्वाती खैरे,उपाध्यक्ष दिलीप देशमुख,कार्याध्यक्ष तुकाराम वाटेकर,संदीप जाधव, सरचिटणीस बाबाजी शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अशोक सावंत,पतसंस्था संचालक सदानंद माळशिरसकर रविकिरण भोसले,विलास पवळे ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक द. मा . पिंगळे, रवींद्र मावळे ,मारुती दिघे,मा. सभापती दिनेश ठाकूर,अखिल भारतीय शिक्षक संघटना अध्यक्ष जालिंदर दिघे ,जिल्हा प्रतिनिधी कल्याण पिंगळे, अरविंद गवारी, नरेंद्र रायकर, भगवान बनकर, केंद्रप्रमुख भीमराव पाटील,राजेंद्र बागुल, विलास निसरड,विलास परहाड,अरुण बनसोडे, महेश नेहेरे, अनिल मरभळ, मा.कार्याध्यक्ष जयमनी हिरे, मुकुंद गावडे,मा. कोषाध्यक्ष रामदास लांघी,बंडू पगार,मसाप चाकण अध्यक्ष कविवर्य मधुकर गिलबिले, कविवर्य मनोहर मोहरे,यांसह खेड तालुका पदवीधर शिक्षक संघटना सर्व कार्यकारिणी व सभासद यांनी प्रयत्न केले,प्रत्येक रक्तदात्यास संघटनेच्या वतीने मास्क ,हँड वॉश,प्रमाणपत्र,तसेच चहा व अल्पोपहार यांची व्यवस्था करण्यात आली होती.

सूत्रसंचालन तुकाराम वाटेकर व भीमराव पाटील यांनी केले,
आभार महिला अध्यक्षा सौ. संजीवनी चिखले यांनी केले.

Previous articleशिक्रापुर मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
Next articleमंचर येथे मोबाईल शॉपीत चोरी