शिक्रापुर मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

शिक्रापूर – येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय मध्ये भाजपाची बैठक संपन्न झाली .यावेळी पुणे जिल्हा कामगार आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.यामध्ये १९ जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड केली गेली.

या बैठकीसाठी पुणे जिल्हाअध्यक्ष गणेशतात्या भेगडे, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, वरिष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब सातव, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तुळशीदास दुंडे, संतोष कर्पे, उद्योग आघाडी अध्यक्ष संजय पाचंगे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पंचायत समिती सदस्य शामभाऊ गावडे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष राजूभाई शेख, ग्रामविकास सहसंयोजक गणेश आखाडे, संघटन सरचिटणीस गोरक्ष काळे, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष बाबासाहेब दरेकर, महादेव वाखारे, संदीप गवारे, केशव पाचर्णे, वैभव गवारे, अक्षय ढमढेरे, पंकज गवारे,‌ हर्षवर्धन काळभोर, विराज शिंदे, दीपक पाचर्णे, पप्पू जाधव, सिद्धेश पाचर्णे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी संघटनात्मक दृष्ट्या तळागाळातील लोकांच्या समस्या पर्यंत पोहोचून ,कुठलीही हवा डोक्यात न जाऊ देता जमिनीवरती पाय ठेवून सामान्य लोकांसाठी काम करण्याच्या सल्ला कार्यकर्त्यांना दिला .
तर प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी कामगार कायद्याबद्दल सविस्तर माहिती देत असताना विरोधक विनाकारण कामगार कायद्याबद्दल चुकीची माहिती कामगार क्षेत्रांमध्ये पसरवत आहेत, नूतन पदाधिकाऱ्यांनी हा कामगार कायदा व्यवस्थित समजून घेऊन त्यासंदर्भात बैठकांचे आयोजन करण्याचे देखील सुचवले.

पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्षप्रदीप दादा कंद यांनी आपल्या भाषणामध्ये तरुण कार्यकर्त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये काम करत असताना ध्येय-वेडे होऊन पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत असे नमूद केले.
यावेळी कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना कामगारांच्या व तरुण वर्गाच्या हितासाठी जे अपेक्षित असेल त्याप्रमाणे काम होइल असे सांगितले

यावेळी नवनिर्वाचीत पदाधिकारी सरचिटणीसपदी मनोज फडतरे, विलास घाटे उपाध्यक्षपदी मोहन हरगुडे, गणेश शांताराम भेगडे, सुरेशतात्या कंद, सुनील साळुंके, संजय सुकुंडे, पंढरीनाथ जोरी, राहुल खळदकर, चिटणीस पदी रोहित बागडे, शशिकांत कुटे, गणेश भापकर, अनिल वाघ, लक्ष्मण सांभारे, तसेच हनुमंत सुतार कार्यकारणी सदस्य यांना नियुक्ती पञ देत सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजनपुणे जिल्हा कामगार आघाडीचे जयेश शिंदे यांनी केले होते.

Previous articleबारामती ते किल्ले शिवनेरी सायकल रॅलीचे जुन्नर मध्ये उत्साहात स्वागत
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शिक्षकांनी केले रक्तदान