एच.पी चौकातील वाहतूक पोलीस चौकीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्धघाटन

महाळुंगे-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पै.गणेश कांताराम बोत्रे यांचा माध्यमातून चाकण वाहतुक विभाग पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंकित चाकण तळेगाव रोडवरील महाळुंगे येथील एच. पी.चौकामध्ये पोलीस चौकीचे उद्धघाटन खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वेळी अरविंद पवार वरिष्ठ पोलिस निरिक्षक महाळुंगे वाहतुक विभाग,सुनील गोडसे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चाकण वाहतुक विभाग आणि पै.गणेश बोत्रे युथ फौंडेशनचे कार्यकर्ते आणि खालुंब्रे ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर
Next articleबारामती ते किल्ले शिवनेरी सायकल रॅलीचे जुन्नर मध्ये उत्साहात स्वागत