आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर

सिताराम काळे, घोडेगाव

– आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला आहे. ज्या ग्रामपंचायतची निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्याच गावाताील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागु झाली असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील निवडणुक असलेल्या ग्रामपंचातीमध्ये सदर निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागु राहिल. या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिका-यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

आंबेगाव तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणा-या गावडेवाडी, पिंगळवाडी-लांडेवाडी, कोळवाडी-कोटमदरा, पिंपळगांव तर्फे म्हाळुंगे, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापुर, शिंगवे, गिरवली, अवसरी खुर्द, मंचर, शेवाळवाडी, खडकवाडी, साकोरे, भागडी, एकलहरे, चिंचोली, खडकी, कारेगांव, पेठ, म्हाळुंगे पडवळ, भराडी, वळती, थुगांव, काळेवाडी-दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ-शिंदेवाडी व कोलदरा-गोनवडी या २९ गावांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात होणार आहे.

ग्रामपंचायतींचा निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. १५ डिसेंबर तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करतील, २३ ते ३० डिसेंबर नामनिर्देशन पत्र सार्वजनिक सुटटी वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करण्याचा कालावधी, ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू केली जाईल, ४ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असेल तसेच निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी ४ जानेवारी दुपारी ३ नंतर प्रसिध्द करण्यात येईल. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहिर होईल, असे आंबेगाव तहसिलदार रमा जोषी यांनी सांगितले.

Previous articleगोहे बु. येथे खास आदिवासींसाठी निसर्गोपचार रूग्णालय सुरु
Next articleएच.पी चौकातील वाहतूक पोलीस चौकीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्धघाटन