आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते वाडा कडूस गटात विविध कामांचे भूमिपूजन

राजगुरुनगर-आमदार दिलीपराव मोहिते पाटील ,पुणे जिल्हा परिषद अध्‍यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष सौ. कांचनताई प्रताप ढमाले यांच्या पाठपुराव्याने वाडा कडूस जिल्हा परिषद गटातील वाडा, बुरसेवाडी, कडधे, कान्हेवाडी,चास-कमान,वेताळे,साबुर्डी,कडूस,वडगाव या गावांमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ गुरुवार दि १०-१२ – २०२० रोजी सर्वांच्या सहकार्यने मोठ्या उत्साहात पार पडला.


या उद्घाटन प्रसंगी खेड आमदार दिलीप राव मोहिते पाटील यांच्यासमवेत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलासराव सांडभोर, युवक अध्यक्ष,कैलासराव लिंबोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, विनायक घुमटकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष. कांचनताई प्रताप ढमाले, अरुणशेठ चांभारे ,धारू कृष्ण गवारी, उद्योजक प्रतापशेठ ढमाले, शशिकला ढमाले, सुलभाताई चिपाडे, सुजाताताई पचपिंड,सविता गारगोटे, निवृत्ती नेहरे ,बाळासाहेब बोंबले ,मारुती जाधव, अभिजीत शेंडे, चंद्रकांत पानमंद, पत्रकार महेंद्र शिंदे आदी मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसायबेजखुशबू संस्थेच्यावतीने खेड तालुक्यातील मोरोशी येथे महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात
Next articleगोहे बु. येथे खास आदिवासींसाठी निसर्गोपचार रूग्णालय सुरु