अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार अशोक पवार यांच्या हस्ते धनादेश वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन -प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभे आहे तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घ्यावी. तसेच या कठीण परस्थितीत लढत असलेले पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी तेथील सरपंच – उपसरपंच – ग्रामपंचायत सदस्य – ग्रामविकास अधिकारी व सेवा भावी संस्था, पत्रकार, विद्युत वितरणचे कर्मचारी यांना पुढील काळात सहकार्य करावे असे आवाहान आमदार अशोक पवार यांनी पूर्व हवेली तालुक्यातील गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या धनादेश वाटप प्रसंगी बोलत होते.

गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिरूर-हवेलीचे आमदार अॅड् अशोक पवार यांच्या हस्ते व हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी आणि हवेली तालुका कृषी अधिकारी एस. जी. नर्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेली तालुक्यातील लोणीकंद, बकोरी, आष्टापुर,भवरापूर, कोरेगावमुळ, खामगावटेक – टिळेकरवाडी, नायगाव , तरडे, प्रयागधाम येथील लाभार्थी शेतकऱ्यांना शासन मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, उरुळी कांचनचे मंडल आधिकिरी दिपक चव्हाण, मा.जि.प.सदस्य शंकर भूमकर, प्रदेश सरचिटणीस रा.यु.कॉ. प्रदिप कंद, युवक अध्यक्ष योगेश शितोळे, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, औद्योगिक विभागाचे डॉ. हेंमत चौधरी, मा.उपसरपंच सुभाष टिळेकर, चित्रपट सांस्कृतिक विभागाचे तालुका अध्यक्ष विशाल भोसले, सरपंच लता चौधरी, उपसरपंच लोकेश कानकाटे आणि लाभार्थी शेतकरी वर्ग तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावकामगार तलाठी, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व ठिकाणी सोशल डिस्टनशिंग ठेवून कार्यक्रम घेण्यात आला.

Previous articleपैलवान राजगुरू केसरी विष्णूदास उर्फ बापु थिटे ( शिवसेना उपतालुकाप्रमुख) यांनी वाढदिवसानिमित्त शेलपिंपळगाव येथिल बालग्राममधील अनाथ मुलांना फळे ,खाऊ व जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
Next articleवीजग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलात महावितरणने सुधारणा करावी – खासदार डॉ.अमोल कोल्हे