तहसील कार्यालयात विजेचा लपंडाव,कामे रखडल्याने नागरिकांमध्ये संताप

Ad 1

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तहसिल कार्यालयामध्ये विदयुत मंडळाची लाईट वारंवार जाण्यामुळे विविध कामांसाठी येणा-या नागरिकांचे कामे होत नसल्याने येथील अधिकारी, कर्मचारी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

विदयुत मंडळाचे कार्यालय तहसिल कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असुन सुध्दा तहसिल कार्यालयातील लाईट सातत्याने जात आहे. कार्यालयातील सर्व कामकाज संगणीकृत झाले आहे. लाईट गेल्याने सर्व कामकाज ठपप होत आहे. यासाठी तहसिल कार्यालयासमोरून आयटीआयला चोविस तास विदयुत पुरवठा गेलेल्या पोलवरून तहसिल कार्यालयाला विदयुत पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कार्यालयाने विदयुत मंडळाकडे पत्र व्यवहार केला आहे. परंतु विदयुत मंडळाच्या संबंधित अधिका-यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही.

तहसिल कार्यालयामध्ये सुमारे ६० ते ७० कि. मी. अंतरावरून नागरिक आपली विविध कामे करण्यासाठी कार्यालयामध्ये येत आहे. परंतु येथे आल्यानंतर लाईट नसल्यामुळे त्यांची कामे वेळेत होत नाही. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांचा नागरिकांबरोबर वादविवाद होत आहे.

तहसिल कार्यालयात येणा-या नागरिकांची कामे वेळेत व्हावी, यासाठी विदयुत मंडळाने सर्व्हे करून चोविस तास विदयुत पुरवठा उपलब्ध करून दयावा, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर यांनी केली.