धुवोलीत “आपले सरकार सेवा केंद्र” सुरू…

Ad 1

वाडा- पच्शिम भागातील तसेच गावातील लोकांना स्थानिक पातळीवर कागदपत्रे,दाखले व सर्व कागदोपञी सोई सुविधा मिळाव्यात म्हणून धूवोली येथे आपले सरकार सेवा केंद्राची सुरुवात झाली आहे.गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत व गावचे उपसरपंच शरद जठार यांच्या हस्ते पार पडले.

आपले सेवा केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे लोकांची तालुक्याची पायपीट थांबणार आहे. या सेवा केंद्राच्या मदतीने लोकांना आपल्या गावातच ही सेवा मिळणार आहे.त्यामुळे गावातील ग्रामस्थांचा मोठा वेळ व पैसा वाचणार असल्याचे उपसरपंच शरद जठार यांनी व्यक्त केले

यावेळी बाळासाहेब थोरात पो पाटील ,उपसरपंच व राष्ट्रीय मानव अधिकार अध्यक्ष शरद जठार,सरपंच सौ.शैला वाघ, ग्रा पं सदस्य विठ्ठल सोळसे, तंटामुकती अध्यक्ष गोविंद जठार,तावरे भाऊसाहेब, रणपिसे भाऊसाहेब,कुशाबा थोरात, मिथुन थोरात, अंकुश शिंदे यांच्या सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.