पैलवान राजगुरू केसरी विष्णूदास उर्फ बापु थिटे ( शिवसेना उपतालुकाप्रमुख) यांनी वाढदिवसानिमित्त शेलपिंपळगाव येथिल बालग्राममधील अनाथ मुलांना फळे ,खाऊ व जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

Ad 1

प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं असताना त्यांना मदत करायलाही अनेक हात पुढे सरसावले असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.खेड तालुक्यातील युवा नेतृत्व शिवसेना उपतालुका प्रमुख राजगुरू केसरी चे मानकरी पैलवान विष्णुदास उर्फ बापु थिटे यांनी लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आपल्या मदतीचा हात देत अनेकांना मदत केली आहेच, परंतु त्यांच्या मित्रपरिवाराने बापूंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साजरा केला.

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील “संपर्क बालग्राम” येथील चिमुकल्यांना खाऊ वाटप करत आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत समाजभान राखत साजरा केला. विशेष म्हणजे बापूंनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पूर्णपणे पालन करत हा कार्यक्रम पार पाडला. यात सोशल डिस्टसिंग राखण्यात आले, सर्वांनी मास्क व सॅनीटायझरचा वापर करत, वैयक्तिक तसेच इतरांच्याही आरोग्याची काळजी घेतली.
“संपर्क बालग्राम” येथील चिमुकल्यांना खाऊ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधानकारक होते. बापूंचा सामाजिक जीवनातील प्रवास हा उल्लेखनीय आहे. ते शिवसेनेच्या माध्यमातून तसेच बजरंग दल खेड प्रखंडच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक कार्यक्रमात सक्रिय असतात.

बालग्राम येथे झालेल्या उपक्रमात विष्णुदास उर्फ बापुसाहेब थिटे मित्रपरिवार, सागरभाऊ दौंडकर, बाळासाहेब दौंडकर, गणेश खरपुडे, गणेश लोखंडे, पांडा पानसरे, संतोष वाडेकर, अनिकेत वाडेकर, पप्पूशेठ पानसरे, अभिजित लांडे, महेश म्हाम्बरे, बाळराजे पानसरे, राजेश शिंदे, प्रसाद लांडे तसेच खेड तालुक्यातील रेटवडी, पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व सर्व सहकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अभिष्टचिंतन केले.

जाहिरात