लाच घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सुचिता भोसले,पुणे -वडगाव मावळ येथील दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टारला नोंदणी करता साडे सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसेवक जितेंद्र दयाराम बडगुजर , वय -५० वर्षे , पद – दुय्यम निबंक्षक , ( Sub – Registrar ) नेमणुक – दुय्यम निबंधक कार्यालय , वडगांव मावळ ता . मावळ , जिल्हा – पुणे असे पकडण्यात आलेल्या सब रजिस्टारचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसेवक जितेंद्र हे वडगाव मावळ येथील रजिस्टार कार्यालयात सब रजिस्टार आहेत. यातील तक्रारदार यांनी दस्त नोंदणीसाठी अर्ज केला होता. दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण देखील झाली. पण त्या नोंदविलेल्या दस्तांवर दस्त सही व शिक्का देण्या ०रूपयांप्रमाणे एकुण १५ दस्तांचे ७,५०० रूपये लाचेची मागणी करून झालेल्या दस्तावर गोल शिक्के मारून देण्यासाठी लोकसेवक जितेंद्र यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.

याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा कारवाईत लोकसेवक जितेंद्र यांना साडे सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. वडगांव मावळ , पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हयाचा तपास श्रीमती वर्षाराणी पाटील , सहायक पोलीस आयुक्त पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. पुणे या करीत आहेत .

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous articleमहिलेचा विनयभंग करत पतीला बेदम मारहाण ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleसख्खी बहीण सुभद्रेपेक्षाही, द्रौपदी कृष्णाची लाडकी बहीण का होती?; वाढदिवसानिमित्त सुमधुर नात्याची ही एक गोड गोष्ट