महिलेचा विनयभंग करत पतीला बेदम मारहाण ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील कासारी येथून स्कूटी वर जाणाऱ्या नवनाथ भुजबळ याला मारहाण व त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी हेमंत सुनील सूर्यवंशी ,सुनील ज्ञानोबा सूर्यवंशी (दोघेही.रा कासारी, ता.शिरूर ) या दोघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी सकाळी पत्नी व पती नवनाथ भुजबळ, तीन महिन्याचे लहान बाळ स्कुटीवरून मराठी शाळेसमोरून जात असताना हेमंत सुनिल सुर्यवंषी याने त्याची मोटार सायकल आडवी मारली त्यावेळीस नवनाथ भुजबळ यांनी तु आमचे गाडीला तुझी गाडी आडवी का मारली असे विचारले असता हेमंत याने शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळीस नवनाथ भुजबळ गाडीवरून खाली उतरले असता हेमंत सुर्यवंशी यांने त्याचे गचुंडे धरून त्यांना हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळीस हेमंत याचे वडिल सुनिल सुर्यवंशी हे मागुन येऊन मारहाण करणेस सुरूवात केली. त्यावेळी भुजबळ यांची पत्नी भांडणे सोडवीण्यासाठी गेले असता सुनिल सुर्यवंशी यांनी तिला धक्का बुक्की करत माझे केस ओढले तिच्या मनात लज्जा उत्त्पन्न होईल असे कृत्य केले सदरची भांडणाचा आवाज एैकुण गावातील शांताराम भुजबळ व माउली भुजबळ हे आले व त्यांनी भांडणे सोडवली त्यांनतर ते तेथुन निघुन गेले. सदरची भांडणे होताना वस्तीमधील बरेच लोकांनी पाहीले आहे. या बाबत हेमंत सुनिल सुर्यवंशी ,सुनिल ज्ञानोबा सुर्यवंशी (दोघेही,रा. कासारी, माळवाडी ता. शिरूर जि. पुणे ) यांचे विरूध्द नवनाथ भुजबळ यांच्या पत्नीने फिर्याद दिली असून पुढील तपास अमलदार पो हवा बनकर करत आहे.

Previous articleसेझ मधील अवैध उत्खननाबाबत उच्च न्यायालयात याचिका
Next articleलाच घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल