घोडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा घेण्याची मागणी

सिताराम काळे, घोडेगाव

– घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सन २००७ ते २०२२ हया ग्रामपंचायत पंचवार्षिक कालावधीसाठी महिला सरपंच पदाचे आरक्षण सलग तीन वर्षे आले आहे. तर पुन्हा एकदा सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी सरपंच महिला पदाचे आरक्षण आले आहे. निवडणूक अधिनियमानुसार सलग तीन पंचवार्षीक एकच आरक्षण देता येत नसल्यामुळे येथील घोडेगाव सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा करण्यात यावी असे लेखी निवेदन तहसिलदार रमा जोशी यांना घोडेगाव मधील स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण पदाची सोडत आंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे झाली.

यावेळी घोडेगाव ग्रामपंचायतीला सन २०२२ च्या निवडणुकीसाठी एस. टी. महिलेसाठी सरपंच पदाचे आरक्षण आले आहे. मागील सन २००७ ते २०१२ साठी ओबीसी महिला आरक्षण होते. सन २०१२ ते २०१७ साठी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण होते. सन २०१७ ते २०२२ साठी एससी महिलेसाठी आरक्षण होते. त्यामुळे सन २०२२ च्या निडणुकीसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षण येणे आवश्यक असताना तसे झाले नाही. त्यामुळे या सोडतीस घोडेगाव मधील पदाधिकारी व ग्रामस्थ यांची हरकत असुन पुन्हा सोडत घेण्यात यावी, असे लेखी निवेदन तहसिलदार रमा जोशी यांना देण्यात आले आहे.

Previous articleडेहणे येथे अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार
Next articleशेतकऱ्यांच्या आंदोलनाला उरुळी कांचन येथे व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून दिला प्रतिसाद