डेहणे येथे अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार

राजगुरुनगर -खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील डेहणे गावातील एका अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. पिडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका युवकावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल नाथाजी तिटकारे (वय २५,रा. नायफड, ता.खेड ) असे आरोपीचे नाव आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिटकारे याचा आठवडी बाजारात गाडी व्यवसाय होता. अल्पवयीन मुलगी एक वर्षापुर्वी बाजारहाट करण्यासाठी वाडा येथे आली होती.

दरम्यान, तिटकारे याने पिडित मुलीची छेडछाड केली होती. झालेला प्रकार घरी सांगू नको मी परत असे करणार नाही असे सांगुन झालेले प्रकरण त्यावेळी मिटवले होते. चार महिन्यांपुर्वी पिडित मुलगी डोंगरावर शेळ्या चारण्यास गेली होती.

त्यावेळी अमोल तिटकारे तिथे जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे अमिष दाखवून जबरदस्तीने दोन वेळा बलात्कार केला. तसेच अधुन-मधुन तो पिडित मुलीला भेटत होता.

पिडिता चार महिण्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात तिटकारे विरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.

Previous articleगावडेवाडी येथे शेतातील बटाट्याची चोरी
Next articleघोडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा घेण्याची मागणी