संतापजनक-साडेपाच वर्षे वयाच्या मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी ४५ वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

लांडेवाडी येथील साडे पाच वर्षाच्या मुलीसोबत त्यांच्याच नात्यातील व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीस अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीनें याबाबत फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीची मुलगी लांडेवाडी येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत असून फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा पोपट सावळेराम डोंगरे( वय ४५ रा. पांगरी माथा जुन्नर )हा लांडेवाडी येथील फिर्यादीच्या मुलीच्या घरी जात असतो लांडेवाडी येथे तो गेला असताना फिर्यादीची लहान नात घरी खेळत असताना पोपट डोंगरे यांनी दिनांक २४ रोजी तिच्याबरोबर अश्लील कृत्य करून कोणास काही न सांगण्याची धमकी दिली त्यानंतर ही मुलगी आजीकडे आली असताना तिला त्रास होऊ लागल्याने तिने आपल्या आजीला सांगितले.आजीने याबाबत विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला आजीने तिला मंचर येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी या मुलीवर प्राथमिक उपचार केले. याबाबत याबाबत मुलीच्या आज्जीने मंचर पोलिस ठाण्यात पोपट सावळेराम डोंगरे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून या व्यक्तीवर बाललैगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करत आहेत.

Previous articleऊसतोड कामगाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; एकावर गुन्हा दाखल
Next articleपैलवान राजगुरू केसरी विष्णूदास उर्फ बापु थिटे ( शिवसेना उपतालुकाप्रमुख) यांनी वाढदिवसानिमित्त शेलपिंपळगाव येथिल बालग्राममधील अनाथ मुलांना फळे ,खाऊ व जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप