अनु.जमातीची ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीना सरपंच पद राखीव ठेवण्याची आदिवासी विचारमंच व बिरसा ब्रिगेड या संघटनानची मागणी

Ad 1

राजगुरूनगर-आदिवासी विचारमंच व बिरसा ब्रिगेड या संघटनानी आज नायब तहसिलदार राजेश कानसकर व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून ज्या ग्रामपंचायत हद्दीत अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकुण लोकसंख्येपेक्षा ५०% इतक्या प्रमाणापेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे.


यावेळी बिरसा ब्रिगेड तालुका अध्यक्ष एकनाथ तळपे, लक्ष्मण मदगे, विकास भाईक, रामचंद्र शिंगाडे रितेश शिंदे, सोमनाथ मुऱ्हे, नामदेव गवारी (सरपंच गोरेगाव ) दिनेश लाडके, अविनाश सुपे, विकास भारती, एकनाथ कोकाटे आदि कार्यकर्ते उपास्थित होते.