संघर्ष प्रतिष्ठान आणि निखिल भैया कांचन युवा मंच आयोजित पद्मश्री मणिभाई देसाई गडकिल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

बदलत्या संस्कृती बरोबर लहान मुलांचे छंद देखील बदलत चालले आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे बालपण वेगळ्या मार्गाने जात आहेत. लहान मुलांना शिवाजी महाराजांचा आणि गडकिल्यांच्या इतिहासाचा अभ्यास होणे त्याची माहिती होणे हे अत्यंत गरजेचे आहे.

संघर्ष प्रतिष्ठान उरुळी कांचन (ता.हवेली) यांच्या मार्फत किल्ले स्पर्धा सलग ७ वर्षांपासून आयोजित केली जात आहे. या वर्षी २८ किल्लेदारांनी अत्यंत उत्कृष्ट असे किल्ले प्रतिकृती बनवून भाग घेतला होता. आज बक्षीस वितरण सोहोळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप , माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन कांचन, युवा नेते निखिल कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष सारिक सय्यद, सचिन कांचन, संदीप कांचन, अनिरुद्ध पवार उपस्थित होते.

स्पर्धेचे मानकरी खालील प्रमाणे
प्रथम क्र. रणझुंजार ट्रेकर्स, सोरतापवाडी.. द्वितीय क्र.छत्रपती ग्रुप, तुपे वस्ती.. त्रितिय क्र. अतुल कोतवाल, दत्तवाडी.. चतुर्थ क्र. साहिल तान्हाजी खलसे, पांढरस्थळ वस्ती.. केदार नितीन जाधव, तुपे वस्ती.. पाचवा क्र. प्रतीक भोंगळे तुपे वस्ती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अनिरुद्ध पवार यांनी तर सूत्रसंचालन संदीप कांचन आभार सारिक सय्यद यांनी मांडले.

Previous articleवाफगाव येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी
Next articleबारामतीत रंगलीय त्या फोटोंची चर्चा…