वाफगाव येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी

अमित पापत

राजगुरुनगर-महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मस्थानी मौजे वाफगाव (ता. खेड जि. पुणे) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानी राणीमहालात मुर्ती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सभास्थानावर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.

वाफगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय भागवत, बाळ सुर्वे पाटील, धनंजय भागवत, बाबाजी कोरडे, विनिम सुर्वे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मगदूम सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.

अहिल्या रत्न फौंडेशन चे अध्यक्ष विक्रांत काळे, महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेशराजे होळकर, कार्याध्यक्ष किरण सोनवलकर पाटील, उपाध्यक्ष विकास माने, सचिव योगेश काळे, सदस्य राहुल सलगर आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Previous articleजिल्हा परिषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर यांच्याकडुन मारूती मंदिरासाठी चांदीची गदा
Next articleसंघर्ष प्रतिष्ठान आणि निखिल भैया कांचन युवा मंच आयोजित पद्मश्री मणिभाई देसाई गडकिल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न