जिल्हा परिषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर यांच्याकडुन मारूती मंदिरासाठी चांदीची गदा

सिताराम काळे,घोडेगाव

गोनवडी (ता. आंबेगाव) गावातील मारूती मंदिरासाठी शिवसेना गटनेते देविदास दरेकर स्वखर्चाने मारूतीला सव्वा किलो चांदीची गदा व काकडयाचा महाप्रसाद देणार असल्याचे गोनवडी गावचे ह. भ. प. विशाल महाराज दौंड व ग्रामस्थांनी सांगितले.

घोडेगाव पेठ जिल्हा परीषद गटातील गोनवडी गावातील मारूती मंदिरासाठी जिल्हा परीषद निधीतून सभामंडपासाठी पाच लक्ष रूपये, एक हायमस दिवा जिल्हा परीषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर यांच्या कडून देण्यात येणार असल्याने गोनवडी ग्रामस्थ व कार्यकारी मंडळाच्या वतीने दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोनवडी गावचे सेक्रेटरी भरत दौंड, ह.भ.प. विशाल महाराज दौंड, खजिनदार बाळासाहेब दौंड, माऊली मंडलीक, पंढरीनाथ नाना दौंड, स्वप्निल इळवे, भाऊसाहेब दौंड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleनारायणगावमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक
Next articleवाफगाव येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी