घरफोड्या करणाऱ्या कुख्यात सी. एम. टोळीचे सराईत गुन्हेगार जेरबंद

प्रमोद दांगट

पिंपरी-चिंचवड ,निगडी ,देहूरोड ,विश्रामबाग ,पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी घरफोड्या करून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या सी.एम.टोळीतील सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 कडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर 5 लाख 50 हजाराचे सोने विकलेल्या सोनाराचा शोध पोलीस घेत आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची तपासणी करत असताना पो.ह. नारायण जाधव व पो.ना.लक्ष्मण आढारी यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पिंपरी-चिंचवड व पुणे शहर आयुक्तालयाचे रेकोर्डवरील तडीपार असलेला सराईत घरफोडया करणारा आरोपी नामे चंद्रकांत ऊर्फ सी.एम अनंत माने,याने त्याचे इतर साथिदारासह मागील २ ते ३ महिन्यात पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडीचे अनेक गुन्हे केले आहेत व तो सद्या उस्मानाबाद जिल्हयात लपुन बसला आहे.बातमीच्या अनुशंगाने गुन्हें शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सलग ३ दिवस उस्मानाबाद जिल्हयात तळ ठोकुन ग्राम- वाघोली गौर, ता कळंब, जि-उस्मानाबाद येथुन सी.एम. टोळीचे १) चंद्रकांत ऊर्फ सी.एम अनंत माने ( वय – २७ वर्षे, रा-मोरया हौसिंग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे ) २) राजु शंभु देवनाथ ऊर्फ राजु बंगाली, वय- २० वर्षे रा- वेताळ नगर, चिंचवड, पुणे,३) राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर, वय- २६ वर्षे रा- मु.पो.वाघोली गौर, ता- कळंब, जि-उस्मानाबाद ,४)अमोल ऊर्फ भेळया अरुण माळी, ऊर्फ घुगे वय- २७ र्षे रा- चिंचवडेनगर. चिंचवड, पुणे, सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.या आरोपींची सखोल चौकशी केली असता सदर टोळीने मागिल २ ते ३ महिन्यांचे कालावधीत पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरात घरफोरडीचे ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन त्यांनी केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरीस गेलेले ३८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ किलो वजनाचे चांदीचे दागिने, घरफोडीचे साहित्य असा एकुण १९,६५.०००/- रु कि चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तर त्याने ज्या सोनारास ५.५०,०००/- रु.कि चे १०९ ग्रॅम वजनाचे सोने विक्री केले आहे त्याचा शोध सुरु आहे.

सदर आरोपीकडून पिंपरी चिंचवड,देहूरोड,निगडी ,देहूरोड ,विश्रामबाग या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या विविध गंभीर गुन्हे उघडकीस आले असून हे आरोपी हे दुपारच्या वेळी आरोपी ऑटो रिक्षाने फिरुन वॉचमन व सी. सी.टी.व्ही नसलेल्या सोसायटी हेरत असे. त्यानंतर सोसायटी मध्ये प्रवेश करुन लॉक असलेल्या फ्लॅटचा कड़ी कोयंडा कटायनी व हातोडयाने उचकटुन व लॉक तोडुन घरात प्रवेश करून चोरी करत होते.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे, पोहवा/ प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ पो.ना/ संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे पो.शि/ शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, तसेच तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखेचे नागेश माळी, राजेंद्र शेटे, यांनी केली आहे.

Previous articleकायदा झाल्यापासून काझड ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधीचे वाटप नाहीच..
Next articleशिरोलीचे माजी उपसरपंच जीतूभाऊ वाडेकर यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम ठाकूर पिंपरी येथील अनाथआश्रमात जाऊन केला वाढदिवस साजरा