तलवार बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

Ad 1

राजगुरुनगर:तलवार बाळगल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एकास अटक केली आहे. कलीम सलीम खान (वय.२२ ) रा. कामोठे नवी मुंबई, असे या युवकाचे नांव आहे.

वडगाव पाटाळे गावचे हद्दीत कडूस ते चांडोली जाणारे रोडचे कडेला एका हाॅटेलचे समोर खान हा त्याचे जवळील अल्टो कार मध्ये धारदार तलवार बेकायदेशीपणे आढळून आला. पोलिसांनी तलवार व कार जप्त करून खान याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार स्वप्नील गाढवे करित आहे..